टीसीएलद्वारे एसीची अत्याधुनिक श्रेणी सादर

घरात स्मार्ट कनेक्टिव्हिटी ठेवण्यासाठी ही उपकरणे गूगल असिस्टंट आणि टीसीएल होम अॅपला सपोर्ट करतात.

मुंबई : जागतिक टीव्ही उदयोगातील अग्रगण्य कंपनी टीसीएलने अत्याधुनिक सुविधांनीयुक्त एअर कंडिशनर्सची नवी श्रेणी सादर केली आहे. ही श्रेणी २३,९९० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीपासून उपलब्ध आहे. घरात स्मार्ट कनेक्टिव्हिटी ठेवण्यासाठी ही उपकरणे गूगल असिस्टंट आणि टीसीएल होम अॅपला सपोर्ट करतात. हे अॅप वापरताना, ग्राहक स्मार्टफोन किंवा साध्या व्हॉइस कमांड्सद्वारेही एसी नियंत्रित करू शकता. यात अत्याधुनिक आय फिल टेक्नोलॉजीचे प्रगत तंत्रज्ञान असून ते उच्च स्पष्टतेसह खोलीचे तापमान मोजण्यास मदत करते.
या एसीमध्ये एआय अल्ट्रा-इव्हर्टर कॉप्रेसर टेक्नोलॉजीसारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. जेणेकरून ते खोलीचे तापमान ६० सेकंदात १८ अंश सेल्सियसपर्यंत नेण्यात जास्तीत जास्त आरपीएम वापरते. तसेच ५० टक्के ऊर्जा बचतीची हमी देते. यामुळे ग्राहकांना भरमसाट वीज बिल भरणे टाळता येईल.
या एसींमध्ये टायटन गोल्ड इव्हॅपोरेटर आणि कंडेन्सर आहे. जे कार्यक्षमता वाढवते व उपकरणाचे आयुष्यही वाढवते. या एसीत सिल्व्हर आयन फिल्टर आहे, जे बॅक्टेरिया आणि विषाणू साठण्यापासून रोखते. यामुळे राहण्याची जागा थंड आणि जंतुविरहीत राहते. तसेच आर-३२ इको-फ्रेंडली रेफ्रिजरंट ही अत्याधुनिक सुविधा प्रभावीपणे उष्णता वाहून नेते. पारंपरिक एअर कंडिशनरपेक्षा पर्यावरणावर कमीत कमी परिणाम करते किंवा ग्लोबल वार्मिंग पोटेंशिअल (जीडब्ल्यूपी) कमी करते.

 349 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.