भाऊराव पोटे माध्यमिक विद्यालयाचा निकाल यंदाही १०० टक्के

.या शाळेत १२०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हुशार मुले शाळेने दत्तक घेतली आहेत.

कल्याण : दत्तकृपा एज्युकेशन ट्रस्टचे भाऊराव पोटे माध्यमिक विद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवत यंदाही १०० टक्के निकाल लागला आहे. कल्याण पश्चिमेतील शिक्षणाची अत्यंत गरज ओळखून दिन दलित, गोर गरीब मुलांसाठी सह्याद्रीनगर परिसरात भाऊराव पोटे विद्यालयाची स्थापना कै. दत्तात्रय तुळशीराम पोटे यांनी १९९० साली केली. या शाळेत १२०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हुशार मुले शाळेने दत्तक घेतली आहेत.
शाळेची प्रगत धेय्य धोरणे संस्था अध्यक्ष सचिन पोटे,संस्था सचिव बिपीन पोटे यांनी आखली असून बालवाडी ते १० वी पर्यंत सेमी इंग्रजी शिक्षणाची सोय केली आहे. आजपर्यंत या विद्यालयाने कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली करत कल्याण शहरात पोटे विद्यालयाने लौकिक प्राप्त केला आहे.

 839 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.