जान्हवी पवारने शालांत परीक्षेत मिळवले ९२.४०% गुण
ठाणे : इयत्ता १०वीचा निकाल जाहिर झाला असून ठाण्यातील एस.टी महामंडळातील ठाणे -२ आगारात वाहकपदी कार्यरत असलेले कर्मचारी श्री.सुभाष विठ्ठल पवार यांची मुलगी जान्हवी सुभाष पवार हिने ९२.४०% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. कुमारी जान्हवी हि मानपाडा येथील सेंट झेवियर्स शाळेमध्ये शिकत होती.तिच्या या यशाबद्दल एस्.टी.महामडळाच्या ठाणे विभागात कर्मचारी आनंद साजरा करीत आहेत.तिच्या या यशाबद्दल ठाणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष सचिन शिंदे व एस.टी इंटक यांचे वतीने जान्हवीचे कौतुक केले तसेच अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
649 total views, 1 views today