लॉकडाऊनमध्ये विद्यार्थी आणि पालकांमध्ये दिसला उत्तम समन्वय

परस्परांना समजून घेत करताहेत सहकार्य

मुंबई : लॉकडाऊनमध्ये भारतीय पालक आणि विद्यार्थी घरातील कामे तसेच शिक्षणात परस्परांना मदत करत आहेत, असे ब्रेनलीच्या ताज्या सर्वेक्षणातून दिसून आले. ब्रेनलीच्या विद्यार्थ्यांनाही हे आवडत आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठीचा जगात सर्वात मोठा ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म असलेल्या ब्रेनलीने ‘पॅरेंटिंग अँड हायब्रिड लर्निंग ड्युरिंग कोव्हिड-१९’ या विषयावर सर्वेक्षण घेतले. २,१३८ सहभागींनी दिलेल्या प्रतिसादातून उत्साहवर्धत ट्रेंड समोर आला आहे.
तब्बल ८७.५% ब्रेनलीच्या यूझर्सनी सांगितले की, ते लॉकडाऊनच्या काळात पालकांना दैनंदिन कामात मदत करतात. यासह ८५.१% विद्यार्थ्यांनी घरी राहिल्यामुळे त्यांच्या पालकांकडून नवी कौशल्ये शिकली. शाळेत शिक्षणासाठी जावे लागत नसल्यामुळे विद्यार्थ्यांकडे इतर कामांमध्ये सहभागी होण्यासाठी भरपूर वेळ शिल्लक राहत आहे. त्यामुळे त्यांना नवी कौशल्ये शिकण्यास मदत होत आहे.
या ट्रेंडद्वारे विद्यार्थी पालकांना मदत करतात, हे तर दर्शवलेच मात्र त्यासोबत आणखीही काही गोष्टी समोर आल्या. भारतीय पालक मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सहभाग घेत आहेत. ८५.२% विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांचा शिक्षणातील सहभाग उपयुक्त वाटतो. ब्रेनलीच्या तीन चतुर्थांश यूझर्स म्हणजे ७४.१% विद्यार्थ्यांनी मान्य केले की, घरून पालकांच्या मदतीने शिकण्यात त्यांना आनंद मिळत आहे.
पालकांपैकी शिक्षणाच्या बाबतीत कोण जास्त कडक आहे, असा प्रश्न विचारल्यास त्याची उत्तरे संमिश्र मिळाली. २८% विद्यार्थ्यांनी आईचे नाव सांगितले तर २४.८% विद्यार्थ्यांनी वडिलांचे नाव सांगितले. तर मोठ्या संख्येने, ४७.३% विद्यार्थ्यांनी हे उत्तर देणे कठीण असल्याचे म्हटले.

 408 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.