वंचित बहुजन आघाडीची मागणी, रामनगर पोलीस ठाण्यात दिले निवेदन
डोंबिवली : कोरोनामुळे डोंबिवलीतील अनेकांनी आपल्या गावी जाणे पसंत केले. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी डोंबिवलीत धुमाकूळ घातला आहे.त्रिमूर्तीनगर, इंदिरानगर आणि आयरेगाव भागात घरफोड्यांचे प्रमाण वाढत आहे.चोरट्यांची डोंबिवली शहराकडे नजर गेली असून पोलीस मात्र त्यांना पकडण्यास का कमी पडत आहे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.यावर गांभीर्याने लक्ष देत वंचित बहुजन आघाडीने डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात वपोनि सुरेश आहेर यांना निवेदन दिले. चोरट्यांना लवकरात गजाआड करा अशी मागणी करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे कल्याण जिल्हा संघटक मिलिंद साळवे, बाजीराव माने,सुरेंद्र ठोके,राजू काकडे, नंदू पाईकराव, अर्जुन केदार आणि पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात वपोनि आहेर यांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे कि,त्रिमूर्तीनगर,इंदिरानगर आणि आयरेगाव भागात मोठ्या प्रमाणात गरीब जनता राहते. लॉकडाऊनमध्ये हाताला काम नाही आणि बाहेर कामासाठी गेलो तर कोरोना होण्याची भीती यामुळे काही दिवस गावे जाणे पसंत केले.येथील काही घरे बंद आहेत याकडे चोरट्यांची नजर गेली. त्यांनी रात्रीच्या वेळी बंद घरातील कडीकोयंडा तोडून घरातील मौल्यवान वस्तू, सामानाची चोरी केली. पोलिसांनी याकडे लक्ष देऊन चोरट्यांना लवकरात अटक करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
433 total views, 1 views today