चालत्या ट्रेनमधून उतरताना गेला होता तोल
कल्याण : चालत्या ट्रेन मधून उतरणाऱ्या प्रवाशाचा तोल गेल्याने रेल्वे खाली जाणाऱ्या प्रवाशाचे प्राण रेल्वे पोलिसांनी वाचवले आहेत. हि घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली असून हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
आज ५२ वर्षीय दिलीप मांडगे हे आपल्या मुलासह कामायनी एक्स्प्रेसने प्रवास करणार होते. मात्र चुकीने पवन एक्स्प्रेसमध्ये चढले. आपण चुकीच्या ट्रेनमध्ये चढल्याचे मांडगे यांच्या निदर्शनास येताच चालू ट्रेनमध्ये स्टेशनवर उतरले. मात्र चालत्या ट्रेनमधून उतरताना दिलीप मांडगे यांचा तोल जाऊन ते खाली पडले. यावेळी त्याठिकाणी तैनात असलेल्या महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे जवान सोमनाथ महाजन आणि आर.पी.एफ.च्या के साहू या महिला कर्मचाऱ्याने समय सूचकता दाखवत मांडगे यांना पकडत रेल्वे ट्रॅकखाली जाण्यापासून वाचविले.
या घटनेत प्रवासी दिलीप मांडगे यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर मांडगे यांनी समय सूचकता दाखवून त्यांचे प्राण वाचविणाऱ्या या रेल्वे पोलिसांचे त्यांनी आभार मानले आहेत.
442 total views, 1 views today