कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांना प्लाज़्मा दान करण्याचे केले आवाहन
नवी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब जन्मदिनांनिमित्त ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार राजन विचारे यांच्या तर्फे २७ जुलै रोजी एन. आर. भगत शाळा सेक्टर १२नेरुळ येथे सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत प्लाज़्मा डोनेशन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सध्या करोना अर्थात कोविड १९चा संसर्ग वाढत चालला आहे म्हणून शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते ह्यांनी जास्तीत जास्त कोविड१९ मधून बरे झालेले रुग्ण सदर प्लाज़्मा डोनेशन शिबिरास घेवून येवून रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन शहरप्रमुख विजय माने आणि प्रविण म्हात्रे यांनी केले आहे.
सदर प्रसंगी
उपनेते आणि म्हाडा झोपडपट्टी सुधारणा मंडळाचे सभापती विजय नाहटा, उत्तर नवी मुंबई जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, दक्षिण नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नवी मुंबई जिल्हा संघटक रंजनाताई शिंत्रे उपस्थित राहणार आहेत.
701 total views, 1 views today