बदलापूरमध्ये समाजूपयोगी उपक्रमाद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस साजरा

तीनशे अँटीजन किट व सहा हजार कुटुंबाना धान्य वाटप

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांचा पुढाकार
बदलापूर : कोरोना संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष व गटनेते कॅप्टन आशिष दामले यांच्या पुढाकाराने आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सफाई कामगारांच्या तपासणीसाठी पालिकेला तीनशे अँटीजन किट देण्यात आले तर सहा हजार गरीब नागरिकांना धान्य वाटप करण्यात आल्याचे कॅप्टन आशिष दामले यांनी सांगितले.
बदलापूर शहरात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सफाई कामगार महत्वाची भुमिका बजावत आहेत. नियमित स्वच्छता ठेवताना पावसाच्या काळात सफाई कर्मचारी हे कोरोना संकट काळात देखील आपली सेवा बजावत आहेत. मात्र त्यांची अद्याप पर्यंत स्वॅब टेस्ट किंवा इतर तपासणी झाली नाही. त्यामुळे फ्रन्टलाइन वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अँटीजन टेस्ट करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांंचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचे आदेश अजितदादांनी दिले होते. तथापि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील सफाई कामगारांची तपासणी करून यंदा वाढदिवस साजरा करण्यात आला असल्याचे आशिष दामले यांनी सांगितले. पालिकेच्या सफाई कामगारांची अँटीजन तपासणी मोफत करण्यासाठी तीनशे किट पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष व गटनेते कॅप्टन आशिष दामले यांनी सुपूर्द केले. यावेळी नितीन म्हसकर, सुदाम घुगे आदी मान्यवर सोबत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साठाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून बदलापूर शहर आणि ग्रामीण भागातील सुमारे सहा हजार गरीब व गरजू कुटुंबांना मोफत धान्य किट देण्यात येणार आले. यामध्ये तांदूळ, तूरडाळ, चणाडाळ, चहा पावडर, साखर, तेल यांची किट तयार करून घरोघरी जाऊन या वस्तू वाटप करण्यात आल्याचे आशिष दामले यांनी सांगितले. ज्येष्ठ पदाधिकारी प्रभाकर पाटील, संतोष कदम, योगेश पाटील, राम लिये आदींच्या नेतृत्वाखाली हे वाटप घरोघरी जाऊन करण्यात आल्याचे आशिष दामले यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या वाढीदिवसाच्या दिवशी ताईज किचन मध्ये सकाळी आणि सायंकाळी मिळून दीड हजार नागरिकांना विनामूल्य मिष्टान्न भोजन देण्यात आले.

 330 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.