राष्ट्र कल्याण पार्टीने जाब विचारत केले बिल कमी
कल्याण : कोरोना काळात खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांची लुट सुरूच असून कल्याण मध्ये देखील मिरा हॉस्पिटल येथे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची हॉस्पिटल व्यवस्थापन अव्वाच्या सव्वा बिल देऊन लुट करत असल्याचा आरोप राष्ट्र कल्याण पार्टीने केला आहे.
कल्याण पश्चिममधील खडकपाडा परिसरात राहणाऱ्या ५३ वर्षीय व्यक्तीला ९ जुलै रोजी कोरोना झाल्यामुळे कल्याण पश्चिमेतील मीरा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी त्या व्यक्तीला डिस्चार्ज देताना तब्बल १ लाख ५८ हजारांचे बिल देण्यात आले. या बिलामध्ये पिपिई कीट आणि इतर गोष्टींचे अव्वाच्या सव्वा बिल लावण्यात आले होते. कोरोना रुग्णांवर उपचार करतांना खाजगी रुग्णालयांना बेड चार्जेस ठरवून दिले आहेत. बेड चार्जेस मध्येच डॉक्टर आणि इतर सुविधा देणे बंधनकारक असतांना डॉक्टर व्हिजीटचे देखील वेगळे चार्ज घेण्यात आले.
याविरोधात राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाला जाब विचारत यापुढे रुग्णांची लूट केली तर हॉस्पिटल विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर हॉस्पिटल व्यवस्थापन ने त्वरित रुग्णांचे बिल कमी करुन दिले. त्यावेळी राष्ट्र कल्याण पार्टीचे महासचिव राहुल काटकर, जिल्हाध्यक्ष हर्षल साळवी, शंभु यादव, प्रविन के.सी., दुर्गेश मिश्रा, सूरज सिंग, संजय यादव व पदाधिकारी। उपस्थित होते.
दरम्यान रुग्णांची लुट करणाऱ्या अशा खाजगी रुग्णालयांवर पालिका प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी राष्ट्र कल्याण पार्टीने केली आहे.
616 total views, 1 views today