कोविड काळात मानधन वाढवून देण्याची मागणी
कल्याण : कल्याण डोबिंवली क्षेत्रात कोरोना लढ्यासाठी कार्यरत असणाऱ्या १०७ आशा वर्कर तुटंपुज्या मानधनावर १० तासाहुन अधीक वेळ काम करीत असून विमा कवचाची श्वाश्वती नसताना देखील काम करून पदरी निराशा पडत असल्याने मानधन वाढीच्या मागणीसाठी केडीएमसी क्षेत्रातील आशा वर्करांनी पालिका मुख्यालयावर धडक दिली.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या १४ आरोग्य केंद्रात २००५-०६ पासून १०७ ‘आशा’( अक्रीडेट सोशल हेल्थ अॅक्टीव्हीस्ट) स्वयंसेविका कार्यरत आहेत. या स्वयंसेवीकाना सुरुवातीला दर महा ५०० रुपये मानधन दिले जात होते. त्यानंतर त्यात हळूहळू वाढ होत गेली. त्यांना महिन्याला दीड हजार रुपये मानधन दिले जात आहे. या स्वयंसेविका गरोदर माता, लहान मुलांचा सव्रेक्षण करतात. त्याचबरोबर ताप रुग्ण, मलेरिया, डेंग्यू, कुष्ठरोग, क्षयरोगाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करीत आहे. प्रधानमंत्री मातृत्व योजना, जननी सुरक्षा योजना या कामाअंतर्गत या स्वयंसेविकांना काही पैसे दिले जातात. त्यानुसार काही स्वयंसेविकांना रुग्णामागे पैसे दिले जातात.
कोविड काळात त्या अपुऱ्या मानधनावर स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वेक्षणाचे काम करीत असून आम्हाला अत्यल्प मानधन दिले जात असून कोविड काळात त्यांना १० हजार रुपये मानधन दिले जावे. तसेच कोरोनाची लागण झाल्यास उपचाराचा खर्च शासनाने करावा, विमा संरक्षण द्यावे अशी मागणी या स्वयंसेविकांनी केली होती. मात्र २ जुलै रोजी निवेदन देऊन देखील प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर त्यांनी १७ जुलै पासून काम बंद आंदोलन पुकारले. मात्र त्यानंतर देखील प्रतिसाद न दिल्याने आज संतप्त आशा स्वयंसेविकांनी थेट पालिका मुख्यालय गाठत आंदोलन केले. जोपर्यंत मागण्या मान्य होणार काही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
1,333 total views, 1 views today