क्रीडा शिक्षकांना मोफत रेशन वाटप संपन्न

स्पोर्ट्स हेल्प फाउंडेशन दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून राबवला उपक्रम

कल्याण : मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील बऱ्याच क्रीडाशिक्षक व प्रशिक्षक यांचे एप्रिल-मे पासूनचे वेतन बंद झालेले अनेक शिक्षकांवर सध्या उपासमारीची वेळ आलेली असून यांच्या मदतीसाठी स्पोर्ट्स हेल्प फाऊंडेशन, कल्याण पुढे सरसावली असून
ज्या क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकाची परस्थिती एकदमच बिकट आहे अशा क्रीडा शिक्षकांना
या उपक्रमा अंतर्गत दहा किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक किलो तूरडाळ, एक किलो तेल, एक किलो मीठ, एक किलो साखर, डाबर च्यवनप्राश, मध, ईम्यूनीटी पवार रियल ज्यूस, टूथपेस्ट, हेअर ऑइल, हळदी- मिर्ची मसाला, साबण व दोन किलो कांदे या महत्त्वाच्या जीवनावश्यक वस्तूचे वाटप २१ जुलै रोजी आमदार गणपत गायकवाड यांचे कार्यालय कल्याण पूर्व, येते महाराष्ट् ऑलिंपिक संघटना सहसचिव महेश लोहार, कोकण विभाग भाजपा क्रीडा संघटनेचे अध्यक्ष अनिल बोरनारे, छत्रपती पुरस्कार विजेते अंकुर आहेर याच्या हस्ते संपन्न झाला.
या उपक्रमाचे भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे सहसचिव नामदेव शिरगावकर, ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन कौतुक केले आहे. सर्वश्री कल्याण पूर्वचे आमदार गणपतशेठ गायकवाड , कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथदादा भोईर, कल्याण पूर्व भाजपा अध्यक्ष
संजय मोरे, क्रीडा संघटक संदीप ओंबासे, पिस्वलीचे शिवसेना विभाग प्रमुख रक्कुभाई शर्मा, समाजसेवक उदयशेठ गायकवाड , पालघर जिल्हा त्वांयक्वादोचे अध्यक्ष अजयभाई पांडे, मुबंई भाजपाचे पदाधिकारी किशोरभाई मनीयाल, समाजसेवक विजयभाई पंडित कल्याण तालुका शारीरिक शिक्षण व शिक्षक मंडळाचे लक्ष्मण इंगळे, उदय नाईक, राजेंद्र शेटे, राजा कोळमकर, गजानन वाघ, संजय काळे, गोपाळ सुर्यवंशी, गुलाबराव पाटील, प्रताप पगार,
जोंधळे हायस्कूलचे मुख्याध्यापक जगदीश उगले, नरेंद्र राणे, बळीराम साळुंखे, रेणुका पिसे, भास्कर ढवळे, दीपक बिरारी सर्व क्रीडाशिक्षक, आरएसपी युनिट कल्याण डोंबिवली मनिलाल शिंपी,(कमांडर), कैलास पाटील, जितेंद्र सोनवणे, बन्सीलाल महाजन, तुषार बोरसे, अनंत किनगे, रोड सेफ्टी कमांडर बद्रीनारायण मिश्रा या सर्वांचे या उपक्रमाला मोलाची मदत भेटली. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्पोर्ट्स हेल्प फाउंडेशनच्या अविनाश ओंबासे, संतोष पाठक, अरुण दिघे, अनिल एटम, अनंत उत्तेकर, अमित धानजी
विशाल जोगदंड, मीतेश जैन, नितीन शिंदे, मंदार कुलकर्णी, योगेश सावंत, अशोक जगताप, सुनील भावसार, चंद्रकांत देठे, उत्कर्षा नाईक, अशोक जगताप,
बी एस जोंधळे, यांनी परिश्रम घेतले.

 590 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.