भाजपा शिक्षक सेलची शिक्षण विभागाकडे मागणी
मुंबई : कोरोनाच्या काळात अनेक पालकांचे रोजगार व उद्योग बंद आहे आर्थिक परिस्थिती बिकट झाली असल्याने यंदा पुरते ११ वी ऑनलाईन प्रक्रियेचे शुल्क माफ करावे अशी मागणी भाजपा शिक्षक सेलने शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे
याबाबत भाजपा शिक्षक सेल मुंबई व जनता शिक्षक महासंघ कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे ही मागणी केली आहे
दहावीचा निकाल जुलै च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार असून त्यापूर्वीच मुंबईसह राज्यातील महानगरांमध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या मार्फत ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून दोन टप्यातील पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे त्याबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून शाळांना मार्गदर्शनक सूचना देण्यात आल्या आहेत.
तथापि राज्यात मुंबईसह अन्य महानगरांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्योगधंदे बंद असून अनेक जण नोकरीला मुकले असल्याने शासनाने यंदापुरते सहानुभूतीपूर्वक विचार करून ऑनलाईन प्रवेश शुल्क माफ करण्यात येऊन शुल्क आकारण्यात येऊ नये अशी मागणी भाजपा शिक्षक सेल मुंबई विभाग संयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे
532 total views, 1 views today