२० जुलै पासून रिक्षा व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्या

कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाची पालिका आयुक्तांकडे मागणी
कल्याण :  रिक्षा व अवलबिंत छोटे व्यवसाय धंदे लॉकडाउन सपुंष्टात आल्यानंतर २० जुलै पासुन सुरु करण्यास परवानगी द्यावी याकरिता कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना   निवेदन दिले आहे.
कोरोना महामारी संकटकाळी सर्व वाहतूकीसह रिक्षा- टॅक्सी वाहतुक शासन आदेशानुसार बंद आहेत. रिक्षा-टॅक्सी व्यवसायिकाचा उदरनिर्वाह रोजच्या दैनंदिन उत्पन्नावरच अवलंबून आहे. परंतू, गेली चार महिने रिक्षा-टॅक्सी व्यवसाय वाहतुक बंद असल्याने रिक्षा चालक व त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा जटील प्रश्न निर्माण झाला आहे. रिक्षा चालकांना जिवन जगणे मुश्कील झाले आहे.
अर्थचक्र सुरू झाले पाहिजे या शासनाच्या धोरणानुसार ओला, टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल, बस, किराणा दुकाने, ऑनलाईन शॉपींग, हॉटिल पार्सल, वाईन शॉप, टि.व्ही मालिका चित्रीकरण यांना परवानगी दिली आहे. तसेच, रिक्षा टॅक्सी चालकांची उपासमारी टाळणे व रोजगार याकरीता सोशल डिस्टन्स व नियमांचे पालन बंधनकार्क करून रिक्षा वाहतुकीस परवानगी आवश्यक आहे. रिक्षा वाहतूक ही संपूर्णतः रेल्वे, मेल, एक्सप्रेस आणि लोकल सेवेवर अवलंबून आहे. आणखी काही महिने रेल्वे सेवा बंद राहण्याची शक्यता आहे.
रिक्षा-टॅक्सी चालक यांच्या उद्रनिर्वाहाची समस्या विचारांत घेता रिक्षा-टॅक्सी व्यवसाय, अवलंबित पुरक छोटे व्यवसाय उद्योग सुरू करण्याची परवानगी दयावी गेली चार महिने रिक्षाचालकांनी रिक्षा बंद ठेवल्या आहेत. या निवेदनाची सहानभूतीपूर्वक दखल घेऊन १९ जुलैचा लॉकडाऊन संपल्यानंतर २० जुलै पासून रिक्षा-टॅक्सी वाहतुक आणि पुरक छोटे व्यवसाय उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी केली आहे. 

 824 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.