लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर कल्याण पोलिसांची कडक कारवाई


१०० केसेस, ४१५ वाहने जप्त, तर २ लाख ४६ हजारांचा दंड वसूल  
कल्याण : कल्याण डोंबिवलीतील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षातघेऊन पालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला असून, या लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर कल्याण पोलिसांनी कडक कारवाई केली असल्याची माहिती कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली.     
कल्याण डोबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी १९ जुलै पर्यत विशेष लॉकडाऊन लागु केला असून त्याअनुषंगाने जनजागृती करण्यासाठी पोलीस ठाण्यातील पीटर मोबाईलस् तसेच रिक्षाद्वारे अनाऊन्समेंट करून जनजागृती करण्यात आलेली आहे. तसेच कल्याण विभागातील ०४ पोलीस स्टेशन अंतर्गत ०८ ठिकाणी नाकाबंदी पॉईंट लावण्यात आलेले आहेत.
 त्या अनुषंगाने कल्याण विभागामार्फत कल्याण पुर्व व पश्चिम भागात १८८ प्रमाणे एकूण १०० केसेस करण्यात आलेल्या आहेत. एकुण ४१५ वाहने जप्त करण्यात आली असुन १०९८ वाहनांच्या चाव्या घेण्यात आल्या आहे. तसेच एकुण १५५७ गाडयांच्या हवा सोडण्यात आल्या आहेत. केडीएमसी पथकाच्या मदतीने मास्क न लावलेले, रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणारे यांचे कडुन १ लाख ११ हजार २५० रूपये व नाकाबंदी दरम्यान ट्रॉफीकच्या मदतीने एकुण १ लाख ३५ हजार रूपयांची दंडात्मक रक्कम वसुल करण्यात आली आहे. असे एकुण २ लाख ४६ हजार २५० रूपये वसुल करण्यात आले आहेत. हि कारवाई केडीएमसी आयुक्त अपर पोलीस आयुक्त, पोलीस उप आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली.

 539 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.