फ्याबी फ्लू ची किंमत घटल्याने कोरोना बधितांना दिलासा

वाढत्या मागणीमुळे उत्पादक कंपनीने तब्बल एक हजार रुपयांची केली घट

मुंबई : कोरोना बाधित रुग्णांवर फ्याबी फ्लू या गोळ्या गुणकारी ठरत असल्यामुळे या गोळ्यांची मागणी बाजारांमध्ये वाढलेली आहे, असं असताना गोळ्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी मात्र एका महिन्यात या गोळ्यांची किंमत रुग्णांसाठी एक हजार रुपयांनी कमी केलेली आहे. सध्या कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त असलेल्या रेमेडेसिविर आणि टोसिलिझुम ही औषधे उपलब्ध होत नसल्याने फ्याबी फ्लू या गोळ्याची मागणी वाढलेली आहे.
संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच यावर कोणतीच लस उपलब्ध नसल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक औषधांचा वापर हा रुग्णांवर करण्यात येत होते. यामध्ये सुरुवातीला अनेक औषधांचा वापर करण्यात येत होता. याच बरोबर रुग्णाला गोळ्यांच्या स्वरूपात फ्याबी फ्लू देण्यात येत आहेत. या गोळ्या गुणकारी ठरत असल्याने अनेक डॉक्टर या गोळ्यावर अधिक भर देत आहेत. या गोळ्याचं उत्पादन ग्लेन्मार्क कंपनी करत असून कालपर्यंत ३४ गोळ्यांच्या एक पाकिटासाठी ३५०० रुपये दर होता. तोच दर कंपनीने कमी करून हे गोळ्यांचे पाकीट २५०० रुपयांना उपलब्ध केले आहे. पूर्वी १०३ रुपयाला गोळी होती. आता हीच गोळी ७५ रुपयाला उपलब्ध झाली आहे. त्या मुळे एका गोळी मागे २७ रुपये बचत झाली आहे.
रेमडेसिविर आणि टोसिलिझुम हे थेट हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होतात. मात्र फ्याबी फ्लू या गोळ्या मेडिकल मध्ये उपलब्ध आहे. रेमंडेसिविर आणि टोसिलिझुमपचा तुटवडा असल्यामुळे पर्यायाने फ्याबी फ्लूची मागणी वाढली आहे. रेमडेसिविर आणि टोसिलिझुम च्या तुटवड्यामुळे पर्यायाने हे उपलब्ध आहे. या गोळ्यांच्या उत्पादन आणि वापरात चार महिन्याचे अंतर आहे , या गोळ्या ४ महिन्यात वापराव्या लागणार असल्याने याचा काळाबाजार अथवा साठा करता येणार नाही. या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणालाही ही देता येत नाहीत. या गोळ्यांच्या पाकिटात एक फॉर्म येतो . तो फॉर्म डॉक्टर आणि रुग्णाने भरून देणे बंधनकारक आहे.
सध्या कोरोना रुग्णाची संख्या वाढली असून फ्याबी फ्लू या गोळ्या गुणकारी ठरत आहेत. या गोळ्यांचे उत्पादन करण्या साठीचा कच्चा माल ग्लेन्मार्क कंपनीला मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या मुळे कंपनीने याचा फायदा थेट रुग्णांना व्हावा यासाठी या गोळ्याची किंमत तब्बल एक हजार रुपयांनी कमी केली आहे.

 529 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.