शालेय विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन

सायबर सुरक्षेचे महत्त्व, आपल्या वैयक्तिक माहितीचे इंटरनेटवरील महत्त्व, सोशल मिडीयाचा सुरक्षित वापर, सुरक्षितपणे इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळणे, इंटरनेटच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक आणि त्यापासून कसे वाचता येते, आपल्या माहितीची सुरक्षितता आदी विषयांवर सायबर तज्ञ धर्मेंद्र नलावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

कल्याण : लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांच्या शाळा बंद असल्याने ऑनलाईन लेक्चर द्वारे विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत आहे. या ऑनलाईन शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचा जास्त संबंध हा इंटरनेटसोबत येत असल्याने हे इंटरनेट हाताळताना विद्यार्थ्यांनी सुरक्षितता बाळगावी या हेतूने कल्याण नजीक असलेल्या महाराष्ट्र मित्र मंडळ शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी “सायबर सेफ्टी अँड अवेरनेस” ह्या व्हर्च्युअल मीडियाच्या साहाय्याने सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.  या मार्गदर्शन सत्रात सायबर तज्ञ धर्मेंद्र नलावडे यांनी मार्गदर्शन केले.
       यावेळी सायबर सुरक्षेचे महत्त्व, आपल्या वैयक्तिक माहितीचे इंटरनेटवरील महत्त्व, सोशल मिडीयाचा सुरक्षित वापर, सुरक्षितपणे इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळणे, इंटरनेटच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक आणि त्यापासून कसे वाचता येते, आपल्या माहितीची सुरक्षितता आदी विषयांवर सायबर तज्ञ धर्मेंद्र नलावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या ऑनलाईन मार्गदर्शन शिबिरात दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत   विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. शाळेचे मुख्याध्यापक धांडे सर व म्हात्रे सर यांच्या प्रयत्नाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 1,021 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.