ठाणे : ठाणे शहरातील लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद करण्याच्या महापालिकेच्या आदेशाला राम मारुती रोडवरील व्यापाऱ्यांकडून तीव्र विरोध केला जात आहे. एकीकडे वाईन शॉपला होम डिलिव्हरीचीपरवानगी देताना, अन्य वस्तूंच्या विक्रेत्यांनी गुन्हा केला आहे का, असा सवाल राम मारुती रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रसिक छेडा यांनी केला आहे. तसेच तत्काळ दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
राम मारुती रोडवरील व्यापाऱ्यांना 5 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन पाळला. सम विषम तारखांना व्यवसायाबरोबरच सोशल डिस्टंसिंगचे पालनही केले. पण ठाणे महापालिकेने अचानक पुन्हा लॉकडाऊन लागू केल्याने, व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला. मुंबई दुकाने उघडी असल्याने ग्राहक तिकडे जात आहेत. आमचा केवळ 10 ते 20% उरलेला व्यवसायही महापालिका करू देत नाही. वाईनशॉप वाल्यांना परवानगी तर दुसऱ्या व्यक्तीच्या वस्तूंचा व्यापार बंदी हा कोणता न्याय, असा सवाल असोसिएशनचे अध्यक्ष रसिक छेडा यांनी केला. या काळात ठाण्यात रुग्ण संख्या वाढत आहे. आणखी लॉकडाऊनमुळे ती कमी होईल का, याचा महापालिकेने विचार करायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
दुकानाचे भाडे, नोकरांचे पगार, लाईट बिल इत्यादी खर्चाने व्यापारी कोलमडले आहेत. अनेक दुकाने बंद पडतील, अशा परिस्थितीत महापालिकेने व्यापार्यांविषयी सहानुभूतीने निर्णय घेऊन दुकाने पुन्हा सुरू करण्यास परवानगी द्यावी. तसेच गेल्या शंभर दिवसांपासून दुकाने बंद असल्याने महापालिकेने व्यावसायिक मालमत्ता कर रद्द करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
934 total views, 2 views today