ज्या नागरिकांची आर्थिक क्षमता नाही अशा नागरिकांची बीपीएल कार्ड, महात्मा फुले आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना अंतर्गत, लोकप्रतिनिधींनी शिफारस केलेले गरीब, मध्यमवर्गीय यांना ही चाचणी पालिकेने मोफत उपलब्ध करून देण्याची केली मागणी
बदलापूर : बदलापूर पालिकेने शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना कोरोनाची अँटीजेन टेस्ट मोफत करावी, अशी मागणी भाजपाचे माजी शहराध्यक्ष व ठाणे जिल्हा नियोजन समिती सदस्य संभाजी शिंदे यांनी प्रशासक जगतसिंग गिरासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ज्या नागरिकांची आर्थिक क्षमता नाही अशा नागरिकांची बीपीएल कार्ड, महात्मा फुले आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना अंतर्गत मोफत अँटीजेन चाचणी करण्यात यावी. त्याशिवाय लोकप्रतिनिधींनी शिफारस केलेले गरीब, मध्यमवर्गीय यांनाही ही चाचणी पालिकेने मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी संभाजी शिंदे यांची मागणी आहे. यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या निर्देशानुसार शहरात उभारण्यात येणाऱ्या टेस्टिंग लॅब मध्ये हि सुविधा निर्माण करावी. यासाठी पुणे महानगर पालिकेच्या धर्तीवर अँटीजेन किट खरेदी प्रक्रिया करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी विनंती आपण निवेदनाद्वारे पालिका प्रशासनाला केली असल्याचे संभाजी शिंदे यांनी सांगितले. शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून पालिका प्रशासनाकडून यासंदर्भात कार्यवाही होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
447 total views, 2 views today