रोटरीचे नवे प्रांतपाल डाॅ. संदीप कदम

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ मध्ये ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर येथील सर्व रोटरी क्लब्स येतात

बदलापूर : रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१४२ च्या प्रांतपाल (गव्हर्नर ) पदाची सूत्रे ठाणे येथील प्रख्यात बालरोग तज्ञ, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, डॉ. संदीप कदम यांनी मावळते प्रांतपाल डॉ. मोहन चंदावरकर यांच्याकडून नुकतीच हाती घेतली.
       या रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ मध्ये ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर येथील सर्व रोटरी क्लब्स येतात. या रोटरी वर्षात  रोटरी सभासदत्व देण्यात युवकाना व महिलाना अग्रक्रम देणार असल्याचे डॉ. संदीप कदम यांनी सांगितले. रोटरी क्लब्सना खेडी दत्तक घेण्यास उद्युक्त करणार असून त्यातून खेड्यांचा विकास साधणार असल्याचे ते म्हणाले. आदिवासी निवासी शाळांसाठी आंतरराष्ट्रीय रोटरीकडून तसेच जिल्ह्यातील सुमारे शंभर क्लब्सकडून अर्थसहाय्य जमा करून विशेष मदत देण्याचा मानस असल्याचे सांगताना अजूनही विविध योजना असल्याचेही डॉ. संदीप कदम यांनी सांगितले. त्यांच्या रोटरी वर्षाचे घोषवाक्य *जोश* (Joy of Serving Humanity) आहे.
    डॉ. संदीप कदम यांनी जिल्हा प्रांतपाल पदाची सूत्रे स्वीकारल्याबद्द्दल रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरिया च्या अध्यक्षा डॉ. श्रद्धा सोमण यांनी अभिनंदन केले आहे. कदम यांचे मार्गदर्शनाखाली बदलापूरचा क्लब समाजोपयोगी विविध उपक्रम यशवीपणे राबविणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले.

 666 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.