दलितांवरील अत्याचार रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी : विलास गायकवाड

रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेने केला राज्य सरकारचा निषेध

कल्याण : लॉकडाऊन काळात संपूर्ण महाराष्ट्रात दलित, बौद्ध आणि अल्पसंख्यांकावर महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात अत्याचार सुरु असून हे अत्याचार रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले असल्याची टिका रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे कल्याण शहर अध्यक्ष विलास गायकवाड यांनी केली आहे. दलितांवरील वाढत्या अत्याचाराचा कल्याण मध्ये रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेने निषेध केला यावेळी ते बोलत होते.
       लॉकडाऊन काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दलित वस्त्यांवर हल्ले, घरे जाळण्याचे प्रकार, दलित बौद्ध तरुणांच्या हत्या झाल्याचे निषेधार्ह प्रकार घडत आहेत. दलित आणि बौद्धांवर वाढत असलेले अत्याचार रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. दलित आणि बौद्ध समाजावर जातीय द्वेषभावनेतून अत्याचार करणार्यांवर तात्काळ अॅट्रॅासिटी अॅक्टप्रमाणे गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना रस्तावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा देखील यावेळी विलास गायकवाड यांनी दिला.
       कल्याण मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे संघटनेच्या वतीने निदर्शने करत राजगृहावरील आणि दलितांवरील होणाऱ्या हल्ल्याचा निषेध करत याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी साजिद चौधरी, अरविंद अंगारखे, जावेद मिर्झा, पांडुरंग चव्हाण आदींसह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.  

 388 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.