युजीसी उपाध्यक्ष पटवर्धन म्हणजे आधुनिक द्रोणाचार्य : मंजिरी धुरी

युजीसी उपाध्यक्ष पटवर्धन यांना विद्यार्थी भारतीने दिला एकलव्यांचा मारेकरी पुरस्कार

कल्याण : युजीसी उपाध्यक्ष पटवर्धन यांनी परीक्षे बद्दल जी मुक्ताफळे उधळली त्याचा तिव्र धिक्कार विद्यार्थी भारतीच्या  मंजिरी धुरी यांनीं करून त्यांना आधुनिक द्रोणाचार्य असे संबोधून एकलव्यांचा मारेकरी असे संबोधले आहे. तसेच त्यांना गेटवेल सून असे ट्विट केले आहे. यू जी सी उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा विद्यार्थी भारती कडून तीव्र निषेध करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यातील १३ विद्यापीठांनी परिक्षा घेणं धोकादायक असल्याचे चिन्ह दर्शवत असताना देखील युजीसीच्या गाईडलाईन्स नुसार परीक्षा घेण्यात याव्या असे वक्तव्य करणाऱ्या पटवर्धन यांना ही प्रक्रिया इतकी सोप्पी कशी वाटू शकते असा प्रश्न विद्यार्थी भारती राष्ट्राध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केला असून येत्या १५ तारखेपर्यत परीक्षेचा निर्णय रद्द न झाल्यास १६ तारखे पासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
कोविड च्या काळात परीक्षा महत्वाच्या की विद्यार्थ्यांचा जीव यातील महत्व ठरवता येत नसण्याइतके पटवर्धन यांचे विचार बालिश आहेत का?  खुद्द उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्यातच काय तर संपूर्ण देशात ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नाही तरी असे हवेत पर्याय देणे कितपत योग्य आहे याचा विचार पटवर्धन यांनी करावा असे देखील विद्यार्थी भारतीच्या वतीने सांगण्यात आले. 

 507 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.