कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा विस्फोट

एकाच दिवशी ६०६ रुग्णांची नोंद तर ८ जणांचा मृत्यू
११५३७ एकूण रुग्ण तर १७२ जणांचा आतपर्यंत मृत्यू

कल्याण : कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला असून आज एकाच दिवशी तब्बल ६०६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ५२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  आजच्या या ६०६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ११५३७  झाली असून यामध्ये ५२९२  रुग्ण उपचार घेत असून ६०७३  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आजच्या ६०६ रूग्णांमध्ये  कल्याण पूर्व -११३, कल्याण प.-१९०, डोंबिवली पूर्व -१३७, डोंबिवली प-१०५, मांडा टिटवाळा- १०, मोहना- ४१ तर पिसवली येथील १० रुग्णांचा समावेश आहे. आज हि रुग्णसंख्या हि आतापर्यंतची सर्वात जास्त रुग्णसंख्या असून लॉकडाऊन लागू केल्यानंतर देखील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिक हवालदिल झाले आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आरोग्य सेवा देण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरली आहे. रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याने बेड मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट होत आहे.

कल्याण डोंबिवलीतील लॉकडाऊन १९ जुलै पर्यंत वाढवला
दरम्यान, वाढती रुग्णसंख्या आणि या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरलेल्या पालिका प्रशासनाने कल्याण डोंबिवलीतील लॉकडाऊन १९ जुलै पर्यंत वाढविला आहे. याआधी १२ जुलै पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. आता पुन्हा संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजेपासून ते १९ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यन लॉकडाऊन जाहीर करत असल्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले आहेत. या कालावधीत याआधी विहित केलेले नियम व उपाययोजना यांची अंमलबजावणी केली जाईल. तसेच उर्वरित अटी व नियम पूर्वी प्रमाणे लागू राहतील.

 415 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.