१९ जुलैपर्यंत ठाण्यात लॉकडाऊन वाढविला


वाढती कोरोना बधितांची आणि मृतांचे प्रमाण पाहून ठाणे महापालिका आयुक्तांचा निर्णय

ठाणे : ठाणे शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी २ ते १२ तारखेपर्यंत लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. मात्र या कालावधीतही कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा १२ तारखेपासून १९ जुलैपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढविण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्तांनी घेतला असून यासंदर्भातील आज आदेशही जारी केले.
मागील काही दिवसांपासून ठाणे महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या ४०० ते ५५० या दरम्यान वाढत होती. तसेच मृतकांची संख्याही सातत्याने वाढत आहे. यापार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

 407 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.