पत्रीपुलावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर केला जात असल्याचा कॉंग्रेसचे कल्याण पूर्व ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांचा आरोप
कल्याण : पावसाळा सुरू झाला असल्याने कल्याण डोंबिवलीतील अनेक रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. अशातच पत्रीपुलावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर केला जात असल्याने हे खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप कॉंग्रेसचे कल्याण पूर्व ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांनी केला आहे.
सर्वात जुना पत्रीपूल धोकादायक झाल्याने तो पाडून त्याठिकाणी नवीन पूल उभारण्याचे काम सुरु असल्याने वाहतुकीचा सर्व ताण बाजूला असलेल्या दुसऱ्या पुलावर येत आहे. अशातच पावसामुळे या ब्रिजवर खड्डे पडले असून हे बुजविण्यासाठी चक्क मातीचा वापर केला जात आहे. अश्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ब्रिज कोसळण्याची शक्यता आहे. पावसामुळे परत खड्डे पडणार, खड्ड्यामुळे अनेकदा अपघात होतात आणि दरवर्षी करोडो रुपयांचे टेंडर काढून सुद्धा त्यात असे निकृष्ट दर्जाचे काम आणि तरीही प्रशासनाला जाग येत नाही याचा फायदा कॉन्ट्रॅक्टर घेऊन अशी निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचा आरोप शकील खान यांनी केला आहे.
निकृष्ट कामामुळे नागरिकांच्या जीवाशी चाललेला खेळ आम्ही ते खपून घेणार नाही. यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याला प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर जबाबदार राहील असा इशारा देखील खान यांनी दिला आहे.
454 total views, 2 views today