तीन पिल्लासह कुत्रीला सोडले होते निर्जनस्थळी
कल्याण : तीन पिल्लासह कुत्रीला निर्जनस्थळी सोडत पिल्लाच्या मृत्युला कारणीभूत ठरल्याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी येथील पुण्योदय पार्क सोसायटीच्या परिसरात वावरणाऱ्या एका कुत्रीला तिच्या तीन पिल्लासह सोसायटीचे सदस्य महेश लाड ४५, आणि महेश सुब्रमण्यम ४६ यांनी एका टेम्पोतून पडघा परिसरात नेऊन सोडले.निर्जन स्थळी असलेल्या या कुत्रीला आणि तिच्या पिल्लांना अन्नपाणी न मिळाल्याने यातील एक पिल्लू मेलं तर एक जखमी झाले असून तिसर्या पिल्लासह सदर कुत्री बेपत्ता झाल्यामुळे सोसायटीत राहणाऱ्या अंजली शर्मा यांनी याबाबत महेश लाड आणि महेश सुब्रमण्यम यांना जाब विचारला असता त्यांनी तुम्हाला काय करायचे ते करा असे सांगत धमकी दिली. यामुळे शर्मा यांनी या दोघाविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
441 total views, 1 views today