कोळसेवाडी पोलिस स्टेशनमधील ३ पुरुष आणि २ महिला पोलिसांना झाली होती विषाणूची लागण
कल्याण : सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला असून कोरोनाच्या काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची यशस्वी अमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा दिवसरात्र ड्युटी करत होते. हि ड्युटी करत असतांना अनेक पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. अशाचप्रकारे कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशनमधील ५ पोलीस कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. आता हे कर्मचारी उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले असून पुन्हा आपल्या कार्त्यव्यावर परतले आहेत. यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आज हे कर्मचारी कोळसेवाडी पोलीस स्टेशनला कामावर रुजू होण्यासाठी आले असता इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करीत टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. झालेल्या या स्वागताने हे कर्मचारी भारावून गेले असून पुन्हा काम करण्यासाठी नवी उर्जा मिळाली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
573 total views, 1 views today