रुग्णालयात कागदपत्रे हाताळण्यात चुका झाल्याचे केले मान्य
ठाणे : ठाणे महापालिकेच्या कोवीड रुग्णालयातुन मृतदेहाची अदलाबदली झाल्यामुळे दोन कुटुंबियांना मनस्ताप सहन करावा लागला असल्याचे सांगत आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी या प्रकारबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी ठाणे महापालिका मुख्याल्यात गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन ही दिलगिरी व्यक्त केली.
या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यात वैद्यकीय चुका झाल्या नसून कागदपत्रे हाताळनीत चुका झाल्याचे समोर आले आहे. रुग्णांच्या चुकीच्या नोंदी करण्यात आल्यामुळे हा प्रकार घडला असून याप्रकरणी रुग्णालयाचे डीन डॉ योगेश शर्मा यांना या पदावरून हटवण्यात आले आहे. तर चार नर्सला कामावरुन काढून टाकले आहे, अशी माहिती आयुक्त शर्मा यांनी दिली. तसेच उपायुक्त विश्वनाथ केळकर यांची पूर्णवेळ रुग्णालयाच्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली असून यामुळे योग्य समन्वय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. रुग्णालयासाठी नवी नियमावली करण्यात आली आहे. त्यानुसार रुग्णाला दाखल करुन घेताना तीन प्रकारच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. यामध्ये रुग्णाच्या आधार कार्ड आणि पॅनकार्डची नोंद केली जाणार आहे. याशिवाय, रुग्णांचा फोटोही त्याच्या फाईलवर लावला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
485 total views, 2 views today