कल्याणातील धक्कादायक प्रकार खाजगी रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा कळस

रिपोर्ट एकाचे उपचार दुसऱ्यावर
कोरोना नसताना केले कोरोनावर उपचार

कल्याण : खाजगी रुग्णालयाने केवळ नावे सारखी असल्याने कोव्हिडची लागण नसताना एका महिला रुग्णावर कोव्हिडं चे उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणात उघड झाला आहे .सदर बाब निदर्शनास आल्यानंतर लॅब सह दोन्ही खाजगी रुग्णालयानी एकमेकांवर जबाबदारी ढकलली असून रुग्णाच्या नातेवाईकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे .तर सदर रुग्ण महिलेला उपचारासाठी कल्याणमधील मीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी परिसरात राहणाऱ्या नीता सावंत यांची ३ जुलै रोजी प्रकृती खालावल्याने त्यांना कल्याणच्या सिटी क्रिटिकेयर रुग्णालयात खाजगी रुग्णालयात दाखल करन्यात आले .त्यांना सफेद पेशी कमी झाल्याचे सांगत त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले दरम्यान त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली .दुसऱ्या दिवशी कोरोनाची चाचणी पोसिटीव्ह आल्याचे सांगत त्यांना कोव्हिडं रुग्णालय ए एन्ड जी रुग्णालयात दाखल करण्यात आले .दोन दिवस या नीता यांच्यावर कोरोना संबधित उपचार करण्यात आले .रुग्णालयाकडून एक इंजेक्शन सांगितल्याने नीता यांचा भाऊ अजय यांनी मुंबई येथील मेडिकलशी संपर्क साधला .मेडिकल चालकाने रिपोर्ट पाठवला असता त्याने नाव जरी सारखेच असले तरी हा रिपोर्ट तुमच्या रुग्णाचा नसल्याचे सांगितले .कुटुंबीयांनी रिपोर्ट पाहिला असता त्यांना नाव नीता सावंत असले तरी वय ४५ वर्ष असल्याचे निदर्शनास आले त्यांनी तत्काळ ए एंड जी रुग्णालय गाठत जाब विचारला मात्र रुग्णालय प्रशासनाणे आमच्याकडे आलेल्या रिपोर्ट नुसार आम्ही उपचार केल्याचे सांगत जबाबदारी सिटी क्रिटिकेयरवर ढकलली .कुटुंबीयांनी सिटी क्रिटिकेयर तसेच लॅबचा जाब विचारला असता त्यांनी देखील एकमेकांवर जबाबदारी ढकलली त्यानंतर कुटुंबीयांनी पालिका मुख्यालय गाठत आरोग्य अधिकऱ्याचा भेट घेत हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालया विरोधात कारवाई ची मागणी केली दरम्यान या रुग्णाला उपचारासाठी कल्याणमधील मीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेतर सिटी क्रिटिकेयर रुग्णालय प्रशासनाने मात्र आम्हि त्यांच्यांवर योग्य ते उपचार केले त्यानंतर लॅब कडून आलेल्या रिपोर्टनुसार त्यांना उपचारा साठी कोव्हिडं रुग्णालयात पाठवले असे सांगितले .पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकरी डॉ प्रतिभा पानपाटील यांनी या प्रकरणी तक्रार प्राप्त झाली असून शहानिशा करून कारवाई करू अशी प्रतिक्रिया दिली .दरम्यान एखाद्या रुग्णावर उपचार सुरू असताना त्याचे रिपोर्ट तपासण्याची तसदी न घेता उपचार करणार्या
रुग्णालयाकडून सुरू असलेला हलगर्जीपणा रुग्णांच्या जीवावर बेतत असल्याने अशा प्रकारे हलगर्जीपना करणाऱ्या रुग्णालयाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे .

 565 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.