महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर कोरोनासाठी रुग्णालय बांधा

कल्याण पूर्व भागातील नागरिकांसाठी युद्धपातळीवर रुग्णालय बांधण्यासाठी पाहिजे ते सहकार्य देण्यासाठी मनसे तयार

कल्याण : कल्याण डोंबिवली परिसरात सातत्याने उपाय योजना आखून पण करोना सारख्या आजाराचा पादुर्भाव वाढतच चालला आहे. कल्याण पूर्वेत देखील कोरोना रुग्णांची संख्या मोठी असून कल्याण पूर्वेतील या रूग्णांसाठी पुर्वेमध्ये असणाऱ्या महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर कोरोनासाठी रुग्णालय तयार करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
गेले काही दिवस महापालिका क्षेत्रात मोट्या संख्येने करोना रुग्णांची वाढ होतांना दिसत आहे. रुग्णांना योग्य ती सुविधा द्याची असेल तर महापालिका क्षेत्रात ३ ते ४ वॉर्डात किंमान एक हॉस्पिटल किंवा प्रत्येक प्रभाग क्षेत्रात एखादे हॉस्पिटल उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. कल्याण पूर्व परिसरात महापालिका मालकीच्या जागेत युद्धपातळीवर करोना हॉस्पिटल उभारून नागरिक ती उपलब्ध करून द्यावी. महापालिका प्रशासनाने महापालिका क्षेत्रातील मालमत्ताचा योग्य विचार केला असता कोणत्याही प्रकारचा मोकळा मैदानात अवाढव्य खर्च करण्याची गरज लागणार नाही. तर त्यामुळे त्यासाठी होणाऱ्या खर्चाला आपण आळा घालून तो पैसा योग्य ठिकाणी लावून नागरिकांनसाठी योग्य ती सुविधा आपण उपलब्ध करून देऊ शकतो असे योगेश गव्हाणे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. कल्याण पूर्वेतील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये ४० ते ५० बेड तर मीरा हॉस्पिटल काटेमनिवली येथे ३० ते ४० बेड आहेत. हे दोन्ही रुग्णालये सद्यस्थितीत बंद आहेत. तसेच सप्तगिरी बिल्डर ग्राउंड व पहिला मजला येथील ५ हजार स्वेअरफुट जागा, आशिष बार समोरील ५ हजार स्वेअरफुट जागा, पुंडलिक हाईट तीसगावं रोड येथील ३ हजार स्वेअर फुट जागा, सहजीवन बिल्डिंग तिसगाव नाक्यावरील महापालिका मालमत्ता याठिकाणी महापालिका त्वरित कोरोनासाठी रुग्णालय सुरु करू शकते याठिकाणी रुग्णालय सुरु करण्यास खर्च देखील कमी लागेल असे गव्हाणे यांनी सांगितले.

 453 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.