राजगृहावर हल्ला करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करा

वंचित बहुजन आघाडीची मागणी

डोंबिवली : ७ जुलै रोजी दादर येथील राजगृहावर काही समाजकंटकानी हल्ला केला. हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करा आणि राजगृह व आंबेडकर कुटूंबाला पोलीस संरक्षण द्या अन्यथा डोंबिवली शहरात तीव्र आंदोलन करण्यात येईल आसा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे कल्याण जिल्हा संघटक मिलिंद साळवे, बाजीराव माने , सुरेंद्र ठोके, प्रभाकर मोरे, अर्जुन केदार रेखा कुरवारे, रजनी आगळे यांनी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरक्षक सुरेश आहेर यांना दिले.

 571 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.