प्रत्येक प्रभागात उभारणार क्वारंटाईन सेंटर

पालिका आयुक्तांनी केली पाहणी

कल्याण :कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रुग्णांवर योग्य उपचार व्हावेत म्हनून पालिकेने विविध उपाययोजना राबवल्या आहेत . पालिकेने सर्वेक्षण आणि टेस्टिंग वाढवल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून या रुग्णांसाठी प्रत्येक प्रभागात क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येत आहे .यासाठी प्रभागातील मंगल कार्यलये ताब्यात घेण्यात येणार आहेत या पार्श्वभूमीवर आज बैलबाजार प्रभागातील लग्नाच्या हॉल ची आज आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी पाहणी केली .
कल्याण पश्चिमेकडील बैल बाजार परीसरातील विनायक मंगल कार्यलयाची पाहणी केली .यावेळी आयुक्तांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पालिकेने चेस द व्हायरस ही स्ट्रेटजी अवलंबली असून टेस्टिंग व सर्वेक्षण वाढवले आहे .सर्वेदरम्यान तापसदृश्य कोरोना सदृश्य रुग्ण आढळतील त्यांना आयसोलेट करायचे आहे .वाढत्या रुग संख्येच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागात क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येत आहे सुमारें २५ हजार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे .ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर ची व्यवस्था करण्यात आली असून डोंबिवली क्रीडा संकुलात १८५ बेडचे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे तर डोंबिवली जिमखाना येथे ७० बेड चे आयसीयू आणि ५१ बेडच ऑक्सिजन ,डोंबिवली पाटीदार येथे २०० ऑक्सिजन बेड ची तयारी तर कल्याण पश्चिमेकडील आर्ट गॅलरी येथे १२५ बेड आयसीयू तर ३५० बेड ऑक्सिजन असणार असून येत्या काही दिवसात हे दोन्ही रुग्णालये सुरू करण्यात येणार आहेत .सद्य स्थितीत ८०० ते ९०० टेस्ट केल्या जात आहेत त्या २००० पर्यन्त वाढवण्याचा प्रयत्न असून पालिकेच्या लॅब चे काम प्रगती पथावर असल्याचे सांगितले .प्रत्येक नगरसेवकाने प्रभागात क्वारंटाइन सेंटर शोधावेत ते कोरोना कमिटी द्वारे चालवले जातील असे आवाहन केले .

 548 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.