ताडाचे झाड आले घराच्या मुळावर

मंगल राघोनगर प्रभागात जिर्ण झालेल्या ताडाच्या झाडाचे खोड कोसळून घराचे झाले नुकसान

कल्याण : कल्याण पूर्वेतील मंगल राघोनगर प्रभागातील  धोंडीराम राघो शिंदे , सन्मित्र चाळ, रुम नंबर ९ , मंगल राघोनगर यांच्या घराच्या बाजुला असलेल्या खूप जुन्या आणि जिर्णावस्तेत असलेल्या ताडाच्या झाडाचे खोड सोमवारी सायंकाळच्या सुमारास  कोसळून घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
सोमवारच्या संततधार पावसामुळे जिर्णावस्तेत असलेले सुमारे २० फुट उंचीचे ताडाचे खोड घरावर कोसळल्याने भर पावसात घरावरील पत्रे तसेच एका बाजुची भिंत कोसकून घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे .
सुदैवाने या घटनेत जिवित हानी टळली असून प्रसंगांवधान ओळखून घरातील मंडळींनी घराबाहेर पळ काढल्याने कोणीही जखमी झाले नाही .
या घटनेची खबर मंगलराघो नगर उत्कर्ष समितिचे रघुनाथ जाधव यांनी प्रभाग ड कार्यालया समोरील अग्निशमन पथकास देताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेउन घरावर पडलेल्या या झाडाचे अवशेष बाजुला केले . या घटनेने कल्याण पूर्वेत अनेक ठिकाणी आजही जिर्णावस्तेत उभ्या असलेल्या ताडांच्या खोडांचा संभाव्य धोक्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .

 521 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.