मंत्र्यांचा आदेश, प्रस्ताव तयार करा! पण नेमका कशाचा? अधिकारी बुचकळ्यात

धारावी, मानखुर्द, गोवंडीचा पुनर्विकास, पण झोपड्यांचा कि इमारतींचा

मुंबई : मागील तीन महिने मुंबईतील कोरोना विषाणूचा वाढत्या प्रसारामुळे शहरातील झोपडपट्या आणि कमी आकारांच्या घरांचा प्रश्नांकडे लक्ष वेधले गेले. यापार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांने गृहनिर्माण विभागाला तीन ओळीचे पत्र पाठवित धारावी, मानखुर्द, गोवंडीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्यास सांगत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करायचे असल्याचे सांगितले. मात्र त्या तीन ओळीच्या पत्रता स्पष्टता नसल्याने झोपडपट्यांचा कि या भागातील जून्या-कालबाह्य इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्याचा कि कसे यावरून प्रशासनातील अधिकारी बुचकाळ्यात पडल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मुंबईत कोरोनाचा प्रसार हा प्रामुख्याने झोपडपट्टीबहुल असलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. त्यावर आता प्रशासनाकडून नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र या बाधितांना त्यांना त्यांच्या घरी होम क्वारंटाईन केल्यास छोट्या आकाराच्या झोपडपट्या किंवा कमी आकाराच्या घरांमध्ये हे शक्य होत नाही. त्यामुळे कोरोनाबाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुर्नवसनाचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र मंत्र्यांनी दोन दिवसांखाली गृहनिर्माण विभागाच्या नव्या सचिवांकडे पत्र पाठविले. या पाठविलेल्या पत्रात मानखुर्द, गोवंडी आणि धारावीचा पुनर्विकास प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. तसेच हे पुनर्विकासाचे काम शिवशाही प्रकल्प कंपनीमार्फत मार्गी लावण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत पुढील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करायचे असल्याने तो प्रस्ताव तयार करून पाठवावा असे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
परंतु प्रस्ताव नेमका कशाचा तयार करायचा झोपडपट्ट्यांचा कि इमारतींचा यात स्पष्टता नसल्याने आम्हाला प्रस्ताव कशाचा तयार करायचा असा प्रश्न पडला असल्याचे त्यांनी सांगत मंत्र्यांच्या अनेक आदेशात अशी स्पष्टता नसल्याने आम्हालाही अनेकवेळा अडचण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

 445 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.