ठाणेकरांचे वीज बिल माफ करण्याची शिवसेनेची मागणी

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांना आर्थिक अडचणी असल्यामुळे वीज बिल माफ करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले निवेदन

ठाणे : कोरोना महामारी संपुर्ण जगात पसरवून त्याचा शिरकाव आपल्या देशातून महाराष्ट्र राज्यात देखील मोठ्या प्रमाणात हाहाकार सुरू आहे.कोरोना विषाणू ला नियंत्रण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे . सदर लॉक डाऊन काळात अनेक नागरिकांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. कित्येक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, व्यवसाय बंद पडलेले आहेत. यामुळे नागरिकांना आर्थिक संकटाचा अतोनात सामना करावा लागत असल्याने नागरिकांच्या जवळचे पैसे देखील शिल्लक राहीलेले नाही. अशातच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळानी लाईट बिले अतिशय भरमसाठ प्रमाणात नागरिकांना पाठवले आहे. यामुळे गोर गरीब जनतेकडील पैसा देखील संपला असल्याचे निदर्शनात येत असल्याने राज्यातील नागरिकांचे वीज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित जैस्वाल यांनी महावितरणचे अधिकारी लेले यांच्याकडे केली आहे.
उदरनिर्वाह बंद असल्याने पैसे नसताना नागरिक कुठून लाईट बिल भरतील, यामुळे ठाण्यातील जनतेला मोठा दिलासा देऊन मार्च -२०२० ते एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट २०२० पर्यंत वीजबिल नागरिकांचे सरसकट माफ करण्याचे अद्यादेश विद्युत कंपन्यांना द्यावेत आणि नागरीकांना संकटाच्या काळात मोठा दिलासा देण्यात यावा.श्रीरंग,वृंदावन,आनंदपर्क,आझादनगर राबोडी,साकेत,रुस्तोमजी मधील लोकांना वाढीव वीज बिल देण्यात आले आहे म्हणून लॉकडाऊन च्या काळात कोणाच्याही वीजपुरवठा खंडित न करणायचे निवेदन सुद्धा त्यावेळी त्यांना देण्यात आले आहे .त्यावेळी विभागप्रमुख अमित जयस्वाल,उपविभागप्रमुख सुहास सामंत,राजेश तावडे,शाखाप्रमुख सुशील ढेम्बरे किशोर सुर्वे,दिलीप वाळिंबे,उपशाखाप्रमुख, संजय देशमुख ,संजय पाटील,सचिन पाटील,संतोष साळुंखे,सुनील गवळी, राजदान,शिंदे सौरभ पाटील ,विशाल शिपाई ,व विभागातील नागरिक उपस्थित होते

 699 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.