इंटकचे एसटी बचाव आंदोलन

        एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाला केले आवाहन

ठाणे: कोरोना (कोव्हीड-१९) या महामारीमुळे केंद्र सरकारने व राज्य सरकारने २३ मार्च २०२० पासून एस.टी. बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदर निर्णयामुळे एस.टी. महामंडळाचे दररोज २२ कोटी रुपयाचे उत्पन्न बुडत असून २१०० कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.  एसटीच्या आर्थिक परिस्थितीमुळे मे महिन्याचे ५० टक्केच वेतन देण्यात आले या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळास आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात यावे यासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १ जुलै रोजी एसटी बचाव-कामगार बचाव आंदोलन राज्यभर जिल्हाधिकारी,तहसीलदार कार्यालयसमोर महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगोटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
             ठाण्यातही महाराष्ट्र राज्य एस्.टी.वर्कर्स काँग्रेस (इंटक)संघटनेच्या ठाणे विभागीय पदाधिका-यांनी ठाणे जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी वैदेही रानडे यांची भेट घेउन या मागण्याचे निवेदन देण्यात आले याप्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष शाम भोईर,सहसचिव मनेश सोनकाबळे,आर.एस.कांबळे,एस्.ए.पवार,एस्.बी.म्हस्के आदि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 456 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.