हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना अभिवादन



जिल्हा परिषदेच्या वतीने कृषि दिन साजरा, शेतकरी बांधवांना प्रशासनाने दिल्या शुभेच्छा

१ जुलै ते ७ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, कृषि क्रांतीचे प्रणेते  वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ठाणे जिल्हा परिषदेचे कृषि सभापती किशोर जाधव  यांनी कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अंकुश माने, कृषि विकास अधिकारी मनोजकुमार ढगे, इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

आज कृषि दिनानिमित्त ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अति मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि. नेमाने यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कृषि दिनाच्या शुभेच्छा देऊन आषाढी एकादशीचे औचित्य साधत बा.विठ्ठलाला देशावर, राज्यावर , जिल्हावर आलेले  कोरोनाचे संकट दूर होवो असे साकडे घालत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या!

जिल्हा प्रशासनामार्फत पालकमंत्री  एकनाथ शिंदे आणि  कृषीमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेनुसार दिनांक १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेऊन, शेतकर्यांचा बांधावर कृषीविषयक योजनांची माहिती या कालावधीत दिली जाणार असून, याबाबत चे नियोजन करण्यात आलेले आहे.

आजच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या शहापूर, अंबरनाथ, मुरबाड, कल्याण , भिवंडी आदी पंचायत समिती कार्यालयात देखील कृषि दिन साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स आणि इतर नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.

शहापुर पंचायत समिती कार्यालयात आमदार दौलत दरोडा यांच्या उपस्थितीत कृषि दिन साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय डॉक्टर दिनी तालुक्यातील डॉक्टरांचे प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आले.तर  मुरबाड पंचायत समिती येथे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या उपस्थितीत कृषि दिन साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील गट विकास अधिकारी, कृषि अधिकारी, इतर अधिकारी कर्मचारी  उपस्थित होते.

 372 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.