अखेर ठरलं ! ठाणे पुन्हा लॉकडाऊन

ठाण्यात १२ जुलैपर्यंत पुन्हा लॉकडाऊन

ठाणे : हो की नाही असा सावळा गोंधळ घातल्यानंतर करोना रुग्णांचा वाढता आकडा नियंत्रणात आणण्यासाठी ठाणे महानगरपालिकेनं पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. २ जुलैपासून ठाण्यात सगळे नियम आणि निर्बंध पुन्हा लागू केले जाणार आहेत. ठाणे महापालिका आयुक्त आणि ठाणे पोलिस संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
२ जुलै रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते १२ जुलैच्या सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील कटेन्मेंट झोनमध्ये अधिक प्रभावीपणे लॉकडाऊनचे नियम कठोर केले आहेत.
जीवनावश्यक वस्तू वगळता इतर व्यवहारांवर निर्बंध जारी करण्यात आले आहेत. फक्त अत्यावश्यक सेवेतीली कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. तसंच सार्वजनिक ठिकाणी आत्यावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी ५पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. सरकारी कार्यालयात वावरताना कर्मचाऱ्यांमध्ये कमीत कमी ३ फूट अंतर राखणं आवश्यक आहे.
व्यावसायिका आस्थापना कार्यालये आणि कारखाने, कार्यशाळा, गोदान इत्यांदींसह सर्व दुकाने त्यांचे कामकाज बंद ठेवतील. सतत प्रक्रिया आणि फार्मास्युटिकल्स इत्यादी आवश्यक असलेल्या उत्पादन आणि उत्पादक युनिट्सना परवानगी असेल तसंच, आवश्यक वस्तूंच्या उत्पादनात गंतलेली मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालवण्यास परवानगी असेल. असं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.
कळवा, मुंब्रा ही आधी अधिक प्रादुर्भावाची क्षेत्रे होती, त्यानंतर आता लोकमान्य नगर, सावरकर नगर, मानपाडा, माजीवडा, नौपाडा कोपरी हे हॉटस्पॉट ठरले आहेत. माजीवडा-मानपाडा भागात दहा दिवसांत अडीचशे नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या दोन-चार दिवसांत कल्याण-डोंबिवलीत तीनशेच्या घरात नव्या रुग्णांची भर पडली आहे. या आधी भिवंडी, अंबरनाथमध्ये पालिकेनं लॉकडाऊन जाहीर केला होता.
दरम्यान, मिरा – भाईंदर परिसरातही पुन्हा एकदा १० दिवसांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. मीरा – भाईंदर महापालिका परिसरात बुधवार संध्याकाळी ५ वाजता ते १० जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन करणे गरजेचं आहे. नागरिकांनी सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन केल्यास पुढील महिन्यात पुन्हा अनलॉक जाहीर करण्यात येईल. अशी माहिती मीरा भाईंदर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

 422 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.