बदलापूरच्या योगिता पाटील व्दितीय क्रमांकाच्या मानकरी

औरंगाबाद येथील जीवन गौरव सार्वजिनक वाचनालय आणि जीवन गौरव शैक्षणिक मासिकाने राज्यातील शिक्षकांसाठी केले होते राज्यस्तरीय ऑनलाईन नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन

बदलापूर : राज्यस्तरीय ऑनलाईन नवोपक्रम स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये बदलापूरच्या महिला मंडळ संचलित कै. द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालयाच्या शिक्षिका योगिता चंद्रकांत पाटील यांनी राज्यातून व्दितीय क्रमांक पटकावला आहे.
औरंगाबाद येथील जीवन गौरव सार्वजिनक वाचनालय आणि जीवन गौरव शैक्षणिक मासिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय ऑनलाईन नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक विभागातून प्रत्येकी आठ पुरस्कार जाहीर करण्यात आले होते . राज्यातील बाराशे शिक्षकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन विविध विषयांवर नवोपक्रम सादर केले होते. नाशिक विभागातून वणी येथील के . आर. टी. शाळेचे शिक्षक प्रवीण पानपाटील यांनी या विभागातून प्रथम क्रमांक पटकावला. प्रा. डॉ. सतीश मस्के, प्रा. डॉ. अशोक डोळस, मुख्याध्यापक रज्जाक शेख यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.
बदलापूरच्या नाईक विद्यालयातील शिक्षिका योगिता पाटील यांनी लॉकडाउनच्या काळातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास या विषयावर नवोपक्रम सादर केला होता. यात त्यांनी व्दितीय क्रमांक पटकावला. संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर बाविस्कर आणि सर्व सहकारी शिक्षकांचे सहकार्य लाभल्याचे योगिता पाटील यांनी सांगितले.

 706 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.