कल्याण-डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची लुट थांबवा

भाजपच्या कार्यकर्त्याचे आरोग्यमंत्र्यांना पत्र

डोंबिवली : कोरोना चाचणीसाठी २५०० रुपये आणि त्यानंतर रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यावर खाजगी रुग्णालयात लाखोंची बिले हे सर्व राजरोजपणे सुरु असताना राज्य सरकार यावर का निर्णय घेत नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. डोंबिवलीत काही रुग्णांना याचा अनुभव आला असून हि लुट थांबवण्यासाठी सरकारला जागे करण्याचे काम विरोधी बाकावर बसलेल्या भाजपाने करावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. यासंदर्भात भाजप डोंबिवली माजी शहर सरचिणीस रविसिंग ठाकूर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र दिले आहे. कल्याण-डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात होत असलेली कोरोना रुग्णांची लुट थांबवा अशी मागणी पत्रात केली आहे.कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील ज्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे त्या रुग्णालयात सदर उपचाराचा दर निश्चित करावा.व्हेटीलेटरची संख्या वाढवा,क्वारटाईनमधील लोकांची काळजी घेतली पाहिजे, कोरोना चाचणी वाढवावी अश्या मागण्या भाजप डोंबिवली माजी शहर सरचिटणीस रविसिंग ठाकूर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार रविंद्र चव्हाण यांनाहि सदर पत्र पाठवले आहे.दरम्यान विरोधी पक्ष म्हणून भाजपने केलेल्या सदर पत्रातील मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. कारण लोकांची उघडपणे सुरु असलेली आर्थिक लुट लवकर थांबली नाही तर जनता सरकारवर नाराज होईल आणि याचा परिणाम येत्या पालिकेच्या निवडणूकित सत्ताधारी पक्षावर होईल.

 530 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.