आजतागायत परिवहन सेवेतील बसचालक, वाहक आणि कर्मचारी वर्गाची कोरोना चाचणी झाली नाही.त्यांना कुठलीही आरोग्यसंदर्भातील सुरक्षा मिळत नसल्याचाही प्रशासनावर आरोप
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत बसवाहक हुसेन बादशाह यांचा कोरीनाने बळी घेतला. रविवारी सकाळी पहाटे चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. याआधी बस चालक राजेंद्र तळेले यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला होता.या घटनेमुळे परिवहन सेवेतील बसचालक आणि वाहक यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. अंबरनाथ येथील बसवाहक हुसेन बादशाह हे १९ वर्ष परीवहन सेवेत काम करत होते.
परिवहन मधील नियोजनशून्य अधिकारी यांना वारंवार पत्र देऊन केंद्रशासित योजनेतील ५० लाखाची केंद्रशासित पॉलिसी वारंवार पत्र देऊन सुद्धा काढली नाही.तरी चालक राजेंद्र तळेले आणि वाहक हुसेन बादशाह या दोघांना केंद्रशासित ५० लाखाची पॉलिसीचे पैसे देण्यात यावे अशी मागणी सर्व परिवहन सेवेतील बसचालक, वाहक आणि कर्मचारी वर्गानी केली.आजतागायत परिवहन सेवेतील बसचालक, वाहक आणि कर्मचारी वर्गाची कोरोना चाचणी झाली नाही.त्यांना कुठलीही आरोग्यसंदर्भातील सुरक्षा मिळत नसल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
524 total views, 2 views today