कोरोना: मुंबईत संख्या नियंत्रित तर ठाणे, पुणे आणि औरंगाबादेत वाढ

२३३० जणांना घरी सोडले तर राज्यात ५४९३ रूग्ण नव्याने, १५६ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात यापूर्वी सर्वाधिक संख्या मुंबई आणि महानगरात रहात होती. पंरतु मुंबई शहरातील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येत असून २ ते अडीच हजाराच्या संख्येने कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या आता १२८७ वर आली आहे. त्यानंतर ठाणे विभागातील कल्याण-डोंबिवली, ठाणे शहर, मीरा भांईदर, वसई विरार मध्ये बाधितांची संख्या वाढत आहे. याशिवाय पुणे मनपा, औरंगाबाद मनपा भागातही दैंनदिन संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे.
मुंबई वगळता ठाणे विभागात २ हजार ६० इतकी संख्या आढळून आली आहे. यातील सर्वाधिक संख्या कल्याण-डोंबिवलीत ४२०, ठाणे जिल्हा ६१६, मीरा भाईंदर ११४, नवी मुंबई २०४, वसई विरारमध्ये २८८ इतके रूग्ण आढळून आले आहेत. तर त्यानंतर पुणे विभागातील पुणे जिल्ह्यात ९३३, पिंपरी चिंचवडमध्ये १७६ बाधिक आढळून आले. तसेच औरंगाबाद जिल्ह्यात २४७ इतके रूग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान राज्यात २३३० बाधित बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे घरी जाणाऱ्यांची संख्या एकूण ८६,५७५ वर पोहोचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.५९ % एवढे झाले आहे. आज राज्यात ५४९३ नवीन रुग्णांचे निदान. राज्यात आज १५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ६० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ९६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५१ % एवढा असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९,२३,५०२ नमुन्यांपैकी १,६४,६२६ ( १७.८२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,७०,४७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,३५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ६४ हजार ६२६ वर पोहोचली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ७० हजार ६०७ वर पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले.

 476 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.