सेन्सेक्सने घेतली ३२९.१७ अंकांची उसळी
मुंबई : सलग दोन दिवस लाल रंगात व्यापार केल्यानंतर भारतीय शेअर बाजाराने शेवटी सकारात्मक स्थिती दर्शवली. निफ्टी ०.१९% किंवा ९४.१०अकांनी वाढून १०,३८३.०० अंकांवर बंद झाला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्सनेही ०.९४% किंवा३२९.१७ अंकांची वृद्धी घेत ३५,१७१.२७ वर व्यापार बंद केला.एंजलब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की व्यापार सत्रात १६२९ शेअर्सनी नफा कमावला. तर १४१ शेअर्सस्थिर राहिले. १०४० शेअर्सचे मूल्य घसरले. बीपीसीएल (६.५०%), इन्फोसिस (६.६४%), टीसीएस(४.९२%), आयओसी (४.७६%) आणि इंडसइंड बँक (३.७६%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तरभारती इन्फ्राटेल (२.८२%), बजाज फायनान्स (३.०९%), आयटीसी (३.०७%), टाटा मोटर्स (१.७३%)आणि कोटक महिंद्रा बँक (२.३५%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.एफएमसीजी आणि फार्मासेक्टर्सनी घसरण अनुभवली तर इतर सेक्टर्सनी हिरवा रंग दर्शवला. बीएसई मिडकॅप ०.२७%नी वाढले तर बीएसई स्मॉलकॅप ०.१९% नी वाढले.भारतीय रुपयाच्या मूल्यातआज थोडा बदल झाला तरीही त्याने आजच्या व्यापारी सत्रात वाढीचे सत्र कायम ठेवले. भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७५.६४ रुपयांचे मूल्य गाठले.कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढतच असल्याने सोन्याच्या दरांनीही सलग तिसऱ्या दिवशी वाढ दर्शवली.सोन्याच्या किंमतीत चढ-उतार दिसून आला तरी स्पॉट गोल्डचे दर १७६० अमेरिकी डॉलरवर स्थिरहोते.जगातील विविध भागातकोव्हिड-१९च्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होऊनही जागतिक बाजाराने वृद्धी दर्शवली. नॅसडॅकने१.०९% ची, एफटीएसई १०० ने १.७२%, एफटीएसई एमआयबीने १.५२%, निक्केई २२५ ने १.१३%ची वाढदर्शवली. तर हँग सेंगने आज ०.९३% ची घसरण अनुभवली.
507 total views, 2 views today