सुमारे ६५ हजार नागरिकांपैकी केवळ ३९ नागरिक संशयित


घरोघरी चाचणीला चांगला प्रतिसाद

बदलापूर : बदलापूर शहरात पालिका प्रशासनाने घरोघरी जाऊन प्राथमिक चाचणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सहा दिवसात पालिकेच्या टीमने २२१४८ घरांमध्ये जाऊन ६४९१४ नागरिकांची तपासणी केली आहे. यातील केवळ ३९ नागरिक संशयित आढळले आहेत. ते सुद्धा रुग्ण आहेत असे नव्हे. पालिकेच्या टीमचे काम चांगले सुरु असून नागरिकांचे सहकार्य मिळत आहे. असेच सहकार्य उर्वरित नागरिकांनी करावे असे आवाहन प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी केले आहे.
पालिकेच्या खाते प्रमुखांची बैठक जगतसिंग गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच पार पडली. त्यावेळी या योजनेची सविस्तर माहिती उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी अधिकाऱ्यांना समजावून सांगितली. शहरातील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्था, आजी माजी लोकप्रतिनधी यांना जगतसिंग गिरासे यांनी वरील आवाहन केले. मुख्याधिकारी दीपक पुजारी, जयेश भैरव, डॉ. राजेश अंकुश, डॉ. हरेश पाटोळे, राजेंद्र बोरकर, प्रवीण वडगाये, दशरथ राठोड, किरण गवळे, सुरेंद्र उईके, सिद्धार्थ पवार, विलास मुठे, प्रतीक्षा सावंत आदी अधिकारी उपस्थित होते.
दहा दिवसांची हि विशेष मोहीम असेल. यात दोन सदस्यांची एक टीम अशा १०७ टीम तयार करण्यात आल्या असल्याचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी सांगितले. या टीमच्या सदस्यांना थर्मामीटर पासून सर्व आवश्यक ते साहित्य पुरविण्यात आले आहे.
पालिकेने १०७ पथकं तयार केली आहेत. या पथकांनी सहा दिवसात २२१४८ घरांमध्ये जाऊन ६४९१४ नागरिकांची तपासणी केली असल्याचे जगतसिंग गिरासे यांनी सांगितले. यापैकी केवळ ३९ नागरिकांमध्ये लक्षणं आढळली असल्याचेही त्यांनी सांगितले. उर्वरित सर्व कुटुंबीयांची सुद्धा तपासणी करण्यात येणार असल्याचे गिरासे म्हणाले.
शहरातील सर्व आजी माजी लोकप्रतिनधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते, सामाजिक, शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी सदस्य आणि सर्व नागरिकांनी या टीम सदस्यांना सहकार्य करायचे आहे. या टीम सदस्यांना पालिकेचे ओळख पत्र देण्यात आले असल्याने नागरिकांनीही या सदस्यांना सर्व माहिती देऊन सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी केले आहे.

 440 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.