सुमारे १ लाख ३५ हजार ४५० रुपयांचा दंड
डोंबिवली : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना काही नागरिक मात्र आजही शहरात बिना मास्क फिरत आहेत अशा नागरिकां विरोधात पालिकेने दंड थोपटले असून गेल्या दोन दिवसात शेकडो नागरिकांवर कारवाई करत तब्बल १ लाख ३५ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल केला आहे
कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका क्षेञात राहणा-या नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना चेह-यावर मास्क, रूमाल परिधान न केल्यास ५०० रूपये दंड आकारण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी।दिले होते . महापालिका क्षेत्रात सदयस्थितीत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्यामुळे व नागरिक मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळुन आल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार चेह-यावर मास्क न लावणाऱ्या व्यक्तींविरुध्द सर्व प्रभाग क्षेत्रात जोरदार मोहिम उघडण्यात आली असून अ प्रभागात मास्क परिधान न करणाऱ्या लोकांकडून ७००० , ब प्रभागात ६७५०० , क प्रभागात १९९५० , ड प्रभागात १४५०० , जे प्रभागात ८००० , फ प्रभागात १८००० , आणि आय प्रभागात ५०० , असा एकुण १,३५,४५० इतका दंड गेल्या दोन दिवसात संबंधीत प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी तेथील स्थानिक पोलिस स्टेशनच्या सहकार्याने वसुल केला आहे.यापुढेही हि मोहिम अशीच पुढे चालू ठेवणेबाबत निर्देश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना दिले आहेत.
448 total views, 1 views today