महावितरणकडून देण्यात येणारी वीज देयके ही अंदाजे आकारण्यात आल्याने वाढीव दिली असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत
ठाणे : करोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच महावितरणकडून ग्राहकांना मीटर रीडिंग न घेता दोन महिन्यांची सरासरी वीज देयके देण्यात आली आहेत. देण्यात आलेली वीज देयके वाढीव रकमेची असल्याने ती कमी करण्यासाठी व त्याबाबतची तक्रार करण्यासाठी विभागीय कार्यालयांत ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील दोन महिन्यांपासून महावितरणकडून घरोघरी जाऊन मीटर रीडिंग घेणे, वीज देयके पाठविणे आदी कामे बंद करण्यात आली होती त्यामुळे वीज ग्राहकांना एप्रिल व मे या महिन्यांची वीज देयके पोहोचली नव्हती. टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात शिथिलता मिळाल्यानंतर ज्या भागात प्रतिबंधित क्षेत्र नाही अशा भागातील वीज ग्राहकांना वीज देयके पाठविण्यास सुरुवात केली आहे. मात्र महावितरणकडून देण्यात येणारी वीज देयके ही अंदाजे आकारण्यात आल्याने वाढीव दिली असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत.
आज कोपरी परिसरातील नागरिकांनी स्थानिक नगरसेवक भारत चव्हाण यांच्या नेतृतवाखाली महावितरण कार्यालयावर वीज देयके कमी करण्यासाठी व त्याबद्दल तक्रार करण्यासाठी ग्राहकांनी मोर्चा काढला होता या वेळी महावितरण अधिकारीयाना निवेदन देण्यात आले . जरी महावितरणने सरासरी बिल काढले असले तरी त्या बिलांमध्येही मोठी तफावत असल्याचे ग्राहकांनी सांगितले आहे. आधीच टाळेबंदीत हाताला काम नाही अशामध्ये वीज देयके कशी भरायची असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला
485 total views, 1 views today