पावसाळ्यात मुरबाड-शहापूरचा संपर्क तुटणार

तिन्ही पुलांची कामे अजूनही अर्धवट

ठाणे : करोना संचारबंदी आणि चक्री वादळाचा तडाखा बसलेल्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हजारो रहिवाशांसमोर आता नवे संकट उभे राहिले आहे. पुरेशा दळणवळण साधनांअभावी येत्या पावसाळयात ग्रामीण भागाचा जगाशी संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुरबाड आणि शहापूर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या तिन्ही मार्गांवरील पूलांची कामे अर्धवट असून त्यातील फक्त एका पुलाचे काम सध्या सुरू आहे. अन्य दोन पूलांची कामे ठप्प आहेत. राज्यात मान्सून दाखल झाल्याने या मार्गावरून ये-जा कराव्या लागणाऱ्या ग्रामस्थांना याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांना जोडणारे तीन मार्ग आहेत. त्यापैकी सोगाव-कोचरे या जिल्हा मार्गावर शाई नदीवरील नव्या पुलाचे काम गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. या नदीवरील सध्या
अस्तित्त्वात असलेला जुना पूल कमी उंचीचा आणि अरुंद आहे. पावसाळ्यात नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला की हा पूल बुडतो आणि दोन तालुक्यांना जोडणारा हा मार्ग बंद होतो. कर्जत-शहापूर मार्गावरील काळू नदीवरील भागदळ पुलाचे कामही गेली तीन वर्षे रखडले आहे. किन्हवली-सरळगांव मार्गावर तिसºया पुलाचे काम मात्र सध्या युद्ध पातळीवर सुरू असून येत्या जून अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा दावा या पुलाचे काम करणाऱ्याकंपनीचे तांत्रिक संचालक गणेश घोलप यांनी केला आहे.
ग्रामीण भागातील नदी आणि ओढ्यांवरील बहुतेक पूल अरुंद आणि कमी उंचीचे आहेत. पावसाळ्यात या पुलांवरून पाणी वाहू लागले की दोन्ही दिशांचा संपर्क तुटतो. त्यामुळे ग्रामस्थ अडकून पडतात. विद्याार्थी, नोकरदार आणि रुग्णांची गैरसोय होते. अनेकदा वाहत्या पाण्यातून चालत अथवा पोहत जाण्याची जोखीम काही ग्रामस्थ पत्करतात. मुरबाड आणि शहापूर या दोन तालुक्यांना जोडणाºया तिन्ही मार्गांवर सध्या मोठ्या आणि रुंद पुलांची कामे सुरू आहेत. मात्र गेले काही महिने त्यांचे काम संथगतीने सुरू आहे. करोना संकटानंतर तर या तिन्ही पुलांचे काम पूर्णपणे ठप्प झाले होते. आता संचारबंदी शिथील झाल्यावर किन्हवली-सरळगांव मार्गावरील पुलाचे काम सुरू झाले आहे. मात्र अन्य दोन पुलांचे काम पावसाळ्यात पूर्ण होण्याची शक्यता नाही. शासनाने प्राधान्याने या पुलांची कामे पूर्ण करून दोन्ही तालुक्यातील रहिवाशांना दिलासा द्याावा, असे आवाहन पंचायत समितीचे सदस्य सुभाष हरड यांनी केले आहे.

 497 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.