आमदार पडळकरांचा राष्ट्रवादी तर्फे निषेध

पडळकर यांची जीभ कापून आणील त्याला पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल असे कालिदास देशमुख यांनी यावेळी जाहीर केले
बदलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस कालीदास देशमुख ह्यांच्या नेतृत्वाखाली वाचाळ वीर आमदार गोपचंद पडळकर ह्यांच्या फोटोला काळी शाइ लावून जोडमार आंदोलन करण्यात आला. पडळकर यांचा जाहीर निषेध केला. जो कोणी पडळकर यांची जीभ कापून आणील त्याला पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल असे कालिदास देशमुख यांनी जाहीर केले.
आमचं दैवत असलेल्या पक्षाध्यक्ष शरद पवार ह्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका करून आपलं राजकीय डमरू वाजवण्याचा अयशस्वी प्रयन्त केला आहे. शरद पवार हे देशातील नव्हे तर जगातील राजकीयदृष्ट्या मोठं नेतृत्व आहे ह्याचा विसर ह्या नवख्या आमदाराला पडला असावा. पडळकर ह्यांचा बोलवीता धनी कोण आहे सर्व जाणतात. ह्या पुढे जर शरद पवार किंवा अन्य कुठला आमच्या नेत्यावर कोणी टीका केली तर जसच तसे उत्तर देण्यात येईन असा इशारा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी यावेळी दिला. जो कोणी पडळकर यांची जीभ कापून आणील त्याला रुपये ५ लाख बक्षीस देण्यात येईल अशी घोषणाही कालिदास देशमुख यांनी यावेळी केली.
जिल्हा युवक उपाअध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा सदस्या अनिशा खान, उपाध्यक्ष दिनेश धुमाळ, युवती अध्यक्ष सायली बळीद, एन डी पाटील, लक्ष्मण फुलवरे, पप्पू भोईर, सुनिद्र पगारे, क्रांती पष्टे, ज्योती वैद्य आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 605 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.