ठाणे महापालिकेच्या आयुक्त पदी विपीन शर्मा अवघ्या तीन महिन्यात आयुक्त विजय सिंघल यांची बदली

ठाणे : ठाणे महानगर पालिकेच्या आयुक्तपदी तीन महिन्यापुर्वी विजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी सायंकाळी त्यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी विपीन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली.
ठाणे महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तडकाफडकी रजेवर गेले होते. त्यानंतर त्यांच्या जागी विजय सिंघल यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली होती. त्यात अवघ्या तीन महिन्यात मंगळवारी त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागी विपीन शर्मा यांची आयुक्त पदी वर्णी लागली आहे. आयुक्त विजय सिंघाय यांच्या बदलीचे वृत्त शहरात पसरताच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा शहरात सर्वत्र सुरु झाली.

 709 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.