दुकानदार, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींवरील गुन्हे मागे घ्या

भाजप प्रदेश सचिव नरेंद्र पवार यांची मागणी

   

डोंबिवली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २२ मार्च पासुन केंद्र सरकारने लॉकडाऊन केले होते. लॉकडाऊन ९० दिवस पूर्ण झाले असून या काळात अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने आणि सुरु ठेवण्याची सरकारने परवानगी देण्यात आली.प्रशासनाने दिलेल्या नियम व सूचनेचे पालन दुकाने सुरु ठेवण्यात आली आहे. मात्र नागरिकांनी गर्दी केल्याने काही छोटे दुकानदार व इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांवर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे याचा विचार करून लॉकडाऊन दुकानदार आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींवरील गुन्हे मागे घ्या अशी मागणी भाजप प्रदेश सचिव तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे केली आहे.

 378 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.