पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याला मान्यवर, ओपिनियन मेकर्सची पसंती

भाजपाच्या डिजिटल संपर्क अभियानांतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्स

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार यांच्याच नेतृत्वाखाली आत्मनिर्भर व सक्षम भारताचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास भाजपाचे ओपिनियन मेकर्स व मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आला. भाजपाच्या डिजिटल संपर्क अभियानांतर्गत आतापर्यंत ठाणे शहरातील ४ मंडलांच्या झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पंतप्रधान मोदींच्या कामाला पसंती दिली गेली.
डिजिटल संपर्क अभियानांतर्गत वर्तकनगर व कोपरी मंडलात भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, लोकमान्य-सावरकर नगर मंडलात आमदार पराग अळवणी, कळवा मंडलात केशव उपाध्ये यांनी मार्गदर्शन केले. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ठाणे शहरातील मान्यवर, भाजपाचे ओपिनियन मेकर्स आणि कार्यकर्त्यांनी भाग घेतला. प्रत्येक कॉन्फरन्समध्ये सुमारे ७० ते ९० जण सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या टर्ममध्ये पहिल्या वर्षातच केलेल्या दमदार कामगिरीची वैशिष्ट्ये कॉन्फरन्समध्ये सांगण्यात आली. अत्यंत साध्या व सोप्या भाषेत मोदी सरकारने घेतलेले निर्णय, त्याचे समाजावर झालेले तत्काळ व दूरगामी परिणामांबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यात कलम ३७०, ३५ ए पासून कोविड प्रार्दूभावात सरकारने केलेली कामगिरी विषद केली. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने कोरोनाच्या काळात केलेली मदत, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात चक्रीवादळानंतर आपद्गग्रस्तांना साह्य आदींबाबतही माहिती देण्यात आली. या बैठकीच्या सुरुवातील चीनविरोधातील धुमश्चक्रीत शहीद झालेले सैनिक व भाजपाचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांना आमदार व जिल्हाध्यक्ष अॅड. निरंजन डावखरे यांनी श्रद्धांजली वाहिली.
या अभियानासाठी निरंजन डावखरे यांच्याबरोबरच महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, कैलास म्हात्रे, निलेश चव्हाण, मनोहर सुगदरे, विलास साठे, परिवहन समिती सदस्य विकास पाटील, वर्तक नगर मंडल अध्यक्ष संतोष जैस्वाल, लोकमान्य-सावरकर नगर मंडल अध्यक्ष निलेश पाटील, कोपरी मंडलाचे अध्यक्ष सिद्देश पिंगुळकर, कळवा मंडलाचे हिरोज कपोते, सारंग मेढेकर, स्वानंद गांगल आदी कार्यकर्त्यांनी मेहनत केली.

 343 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.